Benefits of Pumpkin: भोपळा 'या' आजारांवर ठरतो गुणकारी...

गोमन्तक डिजिटल टीम

जगभरात भोपळ्याच्या १५० हून अधिक प्रजाती आहेत. भोपळ्यात मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही. त्यामुळे शरीरात साखरही नियंत्रणात राहते.

Benefits of Pumpkin | Dainik Gomantak

भोपळ्यात पोटॅशियमही असते. त्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो. हृदयविकाराची जोखिम कमी होते.

Benefits of Pumpkin | Dainik Gomantak

भोपळा हा व्हिटॅमिन ए चा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. मोतीबिंदूचा धोका कमी होतो.

Benefits of Pumpkin | Dainik Gomantak

भोपळ्यात व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तो शरीरासाठी एकप्रकारे इम्युनिटी बुस्टर म्हणून काम करतो.

Benefits of Pumpkin | Dainik Gomantak

भोपळ्यात पाणी भरपूर असल्याने कॅलरीज वाढत नाहीत. वजन कमी करण्यासाठीही भोपळ्याचा फायदा होतो.

Benefits Of Pumpkin | Dainik Gomantak

भोपळ्यामध्ये लोह, झिंक, मँगेनीज, बीटा कॅरोटीन असे अँटी ऑक्सिडंटस् असल्याने त्वचा तजेलदार, टवटवीत राखण्यासाठी त्याचा फायदा होतो.

Benefits of Pumpkin | Dainik Gomantak

भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर असते. त्यामुळे पाचनतंत्र प्रभावी होते. त्याचा फायदा बद्धकोष्ठाची समस्या असलेल्यांना होऊ शकतो.

Benefits of Pumpkin | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा