गोमन्तक डिजिटल टीम
बाजारातून खरेदी केलेला फ्रेश कढीपत्ता हे अधिककाळ फ्रेश राहत नाही आणि तो सुकून जातो. कढीपत्ता सुकला की अनेकजण ती फेकून देतात. पण असे न करता सुकलेल्या कढीपत्त्यांचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता.
बाजारातून फ्रेश कढीपत्ता आणल्यावर त्याला स्वच्छ धुवून त्याची पाने वेगवेगळी करा. त्यानंतर सूती सुक्या कपड्यात ठेवून पंख्याखाली वाळवायला ठेवा.
कढीपत्ता जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी उपाय म्हणजे तुम्ही त्याला एअर टाइट डब्यात खाली टिश्यू पेपर टाकून त्यावर कढीपत्ता ठेवा. एअर टाइट डबा नसल्यास तुम्ही झीप लॉक प्लास्टिक बॅगमध्येही ठेवू शकता.
कढीपत्त्याच्या पावडरमध्ये अँटिऑक्सिडंट्स असते. या पावडरचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
कढीपत्ताचे पावडर हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते तसेच किडनी निरोगी ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.
कढीपत्त्याची पावडरचा वापर हे तुम्ही जेवण बनवताना देखील एखाध्या पदार्थामध्ये टाकू शकता. किंवा मॅरिनेशनसाठी देखील त्याचा वापर करू शकता.
लांब आणि सरळ केसांसाठी देखील कढीपत्त्याची पावडर अतिशय फायदेशीर ठरते.