Akshata Chhatre
आपले हृदय अनेक कारणांमुळे तुटू शकते, पण तुटलेल्या नात्याचं दुःख, म्हणजेच ब्रेकअप, हे सर्वात वेदनादायक आणि खोलवर जाणारं भावनिक रूप असतं.
हे दुःख व्यसनाधीनतेपासून मुक्त होण्याइतकंच तीव्र असतं. पण याच वेदनेतून अनेकदा आयुष्यातले सकारात्मक बदल जन्म घेतात.
पहिलं प्रेम, नकार, विश्वासघात या गोष्टी तरुण वयात फार जिव्हाळ्याच्या असतात. पण जेव्हा हृदय तुटतं, तेव्हा नात्यांमधील फक्त प्रेम नाही, तर संघर्ष, तडजोड, आणि वास्तवाची चवही लागते.
अशा काळात आपण कुटुंब, मैत्र, आणि स्वतःच्या भावना नव्यानं ओळखतो.
काही लोक दुःखातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला व्यग्र ठेवतात, तर काहींना इतकी मोडलेली अवस्था येते की ते उठणंच विसरतात.
जेव्हा प्रेम संपतं, तेव्हा आयुष्य संपत नाही तर बदलतं. आणि त्या बदलातच खरी कविता, खरी प्रेरणा आणि खरं जगणं असतं.