Manish Jadhav
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पर्थ येथे सुरु असलेल्या ॲशेस 2025-26 (Ashes 2025-26) मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव मिचेल स्टार्कच्या (7 विकेट्स) भेदक माऱ्यासमोर केवळ 172 धावांत संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात बेन स्टोक्सची गोलंदाजी निर्णायक ठरली. त्याने अवघ्या 6 षटकांत 23 धावा देत ऑस्ट्रेलियाच्या 5 महत्त्वाच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमावून 123 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या डावाच्या आधारावर इंग्लंडपेक्षा अजूनही 49 धावांनी मागे आहे.
बेन स्टोक्सने आपल्या 5 विकेट्सच्या या कामगिरीने तब्बल 43 वर्षांचा विक्रम मोडला. 1982 नंतर ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 5 विकेट्स घेणारा तो पहिला इंग्लिश कर्णधार ठरला.
यापूर्वी 1982 मध्ये, बॉब विलिस यांनी कर्णधार असताना ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या होत्या. आता स्टोक्सने हा विक्रम आपल्या नावावर केला.
बेन स्टोक्सने 2013 मध्ये कसोटी पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 116 कसोटी सामन्यांमध्ये 7038 धावा केल्या असून 235 विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटी कारकिर्दीत बेन स्टोक्सने सहाव्यांदा 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.