दैनिक गोमन्तक
लिपस्टिक लावण्यासाठी ओठांच्या कोपऱ्यापासून मध्यभागी ब्रशने लावल्यास लिपस्टिक ओठांवर जास्त वेळ टिकेल.
ओठांची चांगली काळजी घ्या कोरड्या ओठांसाठी सॉफ्ट एक्सफोलिएटर लावा, नंतर मॉइश्चरायझर लावले पाहिजे.
लिपस्टिकचा पहिला लेअर लावल्यानंतर टिश्यू पेपरने ओठांवर टॅप करुन अतिरिक्त लिपस्टिक काढून टाका, लिपस्टिक पसरणार नाही.
लिपबेससाठी ओठांवर थोडीशी पावडर लावूनच लिपस्टिक लावावी.
ओठ चांगले राहण्यासाठी स्क्रबरने स्क्रब करा, तसेच ओठांवर लिप बाम लावायला विसरु नका.
लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप पेन्सिलचा वापर करा, न्यूड लिप कलर वापरल्याने लिपस्टिक दिवसभर ओठांवर टिकून राहील.
रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर कोल्ड क्रीम किंवा गावरानी तूप लावू शकता.
चेहर्याप्रमाणेच ओठांवर प्राइमर लावून लिपस्टिक लावा, त्याने लिपस्टिक जास्त वेळ टिकेल.
लिपस्टिकमध्ये मॅट आणि वॉटर प्रूफ लिपस्टिकचा वापर करा.