Akshata Chhatre
वय हे फक्त एक संख्या आहे, हे जर कोणी ठामपणे सिद्ध केलं असेल तर ती अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर.
९० च्या दशकात ‘राजा हिंदुस्तानी’मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी करिश्मा आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर असूनही तिच्या सौंदर्याची झळाळी तशीच कायम आहे.
तिच्या त्वचेचा ताजेपणा, नैसर्गिक चमक, आणि आत्मविश्वास यांचं गुपित कोणत्याही महागड्या स्किन प्रॉडक्ट्समध्ये नसून तिच्या साध्या आणि संतुलित दिनचर्येत आहे.
ती दही आणि बदाम तेल वापरून घरगुती फेसपॅक लावते, दिवसभर भरपूर पाणी पिते, आणि सनस्क्रीनला नेहमी प्राधान्य देते.
ताजी फळं, खासकरून व्हिटॅमिन C युक्त फळांचा आहारात समावेश करून ती त्वचेला आतून पोषण देते. केवळ बाह्य सौंदर्यावर नाही, तर योग, ध्यान, वेळेवर झोप आणि सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टींमुळे तिचा चेहरा आतून उजळतो.
तिचा एकच मंत्र आहे सौंदर्य म्हणजे फक्त चेहरा नाही, तर तुमच्या संपूर्ण जीवनशैलीतून झळकणारं आरोग्य आणि शांतता.