Akshata Chhatre
फेशियलची सुरुवात होते ती चेहरा नीट स्वच्छ करण्यापासून. यासाठी एक कॉटन बॉल थंड दूधात भिजवा आणि चेहऱ्यावर हलक्याने फिरवा.
दूधातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला खोलवर स्वच्छ करतं आणि सौम्य एक्सफोलिएशनही होतं. त्यामुळे चेहऱ्यावरील धूळ, तेल आणि प्रदूषण सहज निघून जातं.
एका चमचा साखर पावडर, एक चमचा कॉफी, आणि दोन चमचे एलोवेरा जेल एकत्र मिसळा. हा स्क्रब २–३ मिनिटं चेहऱ्यावर हलक्या हाताने रगडा.
यामुळे ब्लॅकहेड्स, डेड स्किन आणि गडद थर निघून जातो, आणि त्वचा मृदू व नितळ भासते.
एलोवेरा जेलमध्ये थोडीशी फ्रेश मलाई मिसळा आणि या मिश्रणाने चेहऱ्यावर हलकं मसाज करा. ही मसाज त्वचेला मॉइश्चर देते, त्वचा घट्ट करते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत करते.
थोडी गुलाबाची पाने, त्यात दूध आणि एक चमचा मध घालून मिक्सरमध्ये बारीक वाटा. हा पॅक चेहऱ्यावर लावून १५ मिनिटं ठेवा. साध्या पाण्याने धुवा.