दैनिक गोमन्तक
आजकाल वाढता ताण आणि प्रदूषण यामुळे पांढरे केस होण्याचे प्रमाण वाढले आहे.
बाजारात पांढर्या केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँडेड डाई उपलब्ध असतात.
शरीरात व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन सी आणि ईची कमी झाल्याने केसांच्या समस्या उभ्दवतात.
तुम्ही पांढऱ्या केसांसाठी घरीच आवळ्याचे तेल बनवू शकतात.
त्यासाठी 10-15 आवळे आणि खोबरेल तेल किंवा बदामचे तेल घेऊ शकतात.
आवळे आधी उन्हात वाळवून घ्या नंतर आवळ्यांची बारीक पावडर बनवा.
लोखंडी कढईत तेल घालून पावडर थोडावेळ तळल्यानंतर खोबरेल तेल घाला, तेल थंड झाल्यानंतर बाटलीत भरुन ठेवा.
तेलाची बाटली साधारण 15 दिवस उन्हात ठेवा आणि नंतर तेल गाळून घ्या.
तेल केसांच्या मुळांना आणि टाळूला लावा यानंतर केस चांगले धुवून घ्या.
आठवड्यातून फक्त 2-3 वेळा हे तेल वापरल्याने तुम्हाला फरक दिसेल.