Pranali Kodre
बीसीसीआयने 1 जुलै 2023 रोजी भारतीय संघाच्या प्रमुख प्रायोजक कंपनीची घोषणा केली आहे.
बीसीसीआयने महिती दिली की ड्रीम इलेव्हन ही भारतातील फँटेसी स्पोर्ट्स गेमिंग कंपनी भारतीय संघाचे प्रमुख प्रायोजक असतील.
ड्रीम इलेव्हनचा भारतीय संघाचे प्रायोजक म्हणून तीन वर्षांचा करार आहे.
त्यामुळे आता पुढील तीन वर्षांसाठी भारतीय संघाच्या जर्सीवर प्रमुख प्रायोजक म्हणून ड्रीम इलेव्हनचे नाव दिसणार आहे.
भारतीय संघाच्या 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यापासूनच जर्सीवर ड्रीम इलेव्हनचे नाव दिसणार आहे.
यापूर्वी बायजू भारतीय संघाचे प्रमुख प्रायोजक होते, पण त्यांचा करार संपला आहे.
दरम्यान ड्रीम इलेव्हनने भारतीय संघाचे प्रायोजकत्व मिळवल्याबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
ड्रीम इलेव्हनचे सीईओ हर्ष जैन यांनीही या कराराबद्दल आनंद व्यक्त केला.