गोमन्तक डिजिटल टीम
मायकल जॉर्डन
अमेरिकन बास्केटबॉलपटु मायकल जॉर्डन हा जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. त्याची संपत्ती 2.2 बिलियन डॉलर्स म्हणजे 17 हजार कोटी रूपये आहे. त्याने एनबीएल या व्यावसायिक बास्केटबॉल लीगमध्ये शिकागो बुल्स आणि वॉशिंग्टन विझार्ड्सकडून एकुण 15 सीझन्स खेळले आहेत.
व्हिन्से मॅकमहॉन
WWE चा चेअरमन, सीईओ आणि मालक असलेल्या व्हिन्से मॅकमहॉनची एकुण संपत्ती 1.6 बिलियन डॉलर म्हणजे 12 हजार कोटी रूपये आहे. व्हिन्से हे स्वतः प्रोफेशनल रेसलर आहेत.
इयॉन टिरियाक
हा रोमानियाचा खेळाडू आईस हॉकी आणि टेनिस मधून निवृत्त झाला आहे. तो एक उद्योगपती देखील आहे. त्याची संपत्ती 11 हजार कोटी रूपये इतकी आहे.
अना कॅस्पारझाक
ड्रेसेज रायडर असलेल्या अना कॅस्पारझाक ही डेन्मार्कची खेळाडू आहे. ती ड्रेसेज रायडर आहे. हा हॉर्स रायडिंगचा एक प्रकार आहे. तिची संपत्तीही 11 हजार कोटी रूपये इतकी आहे.
टायगर वुड्स
गोल्फपटु टायगर वुड्सची संपत्ती 800 मिलियन डॉलर म्हणजे 6 हजार 400 कोटी रूपये इतकी आहे. विविध स्पर्धांचा विजेता आणि विविध ब्रँड एंडॉर्समेंटमुळे टायगर श्रीमंत खेळाडुंच्या यादीत अनेक वर्षांपासून आहे.
ज्युनियर ब्रिजमन
ज्युनियर ब्रिजमन हा 12 वर्षे व्यावसायिक बास्केटबॉल खेळला आहे. त्याची संपत्ती 600 मिलियन डॉलर्स म्हणजे 4 हजार 800 कोटी इतकी आहे.
मॅजिक जॉनसन
हा देखील बास्केटबॉलपटु असून त्याने एनबीएमध्ये 13 सीझन खेळले आहेत. तो सध्या निवृत्त झाला आहे. त्याची संपत्तीही 4 हजार कोटी रूपयांहून अधिक आहे.