Rahul sadolikar
टेलिव्हिजन अभिनेत्री बरखा बिश्त आणि अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता यांच्या डिव्होर्सच्या बातमीने टेलिव्हिजन विश्वात खळबळ उडाली आहे.
बरखा बिश्तने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डिव्होर्सविषयी सांगितले आहे.
दोघांनी 13 वर्षांच्या सहजीवनानंतर शेवटी डिव्होर्सचा निर्णय घेतला आहे.
'प्यार के दो नाम एक राधा एक शाम' या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
2008 साली दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
2011 साली दोघांना मीरा हे कन्यारत्न झालं.
अशी चर्चा आहे कि दोघांच्या आयुष्यात तिसऱ्या कुणाच्या येण्यामुळे हा दुरावा वाढला आहे.