Manish Jadhav
वांद्रे किल्ला मुंबईतील वांद्रे परिसरात असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दाखवणारा हा किल्ला महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे.
हा किल्ला सुमारे 1640 मध्ये पोर्तुगीज लोकांनी बांधला होता. त्यांना अरबी समुद्रातून येणाऱ्या शत्रूंपासून बचाव करायचा होता, म्हणून त्यांनी हे ठिकाण निवडले.
या किल्ल्यावरुन माहीमची खाडी आणि अरबी समुद्रावर सहज लक्ष ठेवता येत होते. शत्रू जहाजे समुद्रातून येतात का, हे पाहण्यासाठी हे ठिकाण खूप महत्त्वाचे होते.
1739 मध्ये मराठा सैन्य या किल्ल्यावर हल्ला करेल, या भीतीने ब्रिटिश सैन्याने स्वतःच या किल्ल्याचा काही भाग तोडून टाकला होता, जेणेकरुन मराठ्यांना त्याचा फायदा मिळू नये.
आज हा किल्ला मुंबईतील उत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इथून तुम्ही समुद्राचे, वांद्रे-वरळी सी-लिंकचे आणि सूर्यास्ताचे खूप सुंदर दृश्य पाहू शकता.
वांद्रे किल्ला अनेक वर्षांपासून बॉलीवूडचे आवडते शूटिंग स्पॉट राहिले आहे. 'दिल चाहता है' आणि 'जाने तू या जाने ना' यांसारख्या चित्रपटांतील काही दृश्ये येथे चित्रित झाली आहेत.
2003 मध्ये मुंबईतील काही संस्थांनी पुढाकार घेऊन या किल्ल्याची दुरुस्ती (Restoration) केली, ज्यामुळे आज आपण त्याला चांगल्या स्थितीत पाहू शकतो.
हा किल्ला म्हणजे मुंबईच्या इतिहासाचा आणि स्थापत्यकलेचा एक महत्त्वाचा भाग आहे. शांत आणि सुंदर वातावरणामुळे अनेक लोक इथे फिरायला येतात.