Akshata Chhatre
तुम्ही केळी खाल्ल्यावर त्याची साल फेकून देता का? जर हो, तर तुम्ही मोठी चूक करताय! केळीच्या सालीत नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्सपेक्षा स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या या सालीच्या वापराने मुरुमं, काळे डाग, डार्क सर्कल्स, ब्लॅकहेड्स आणि कोरड्या त्वचेच्या समस्या दूर करता येतात.
डोळ्यांखालील डार्क सर्कल्ससाठी केळीच्या सालीचा पांढरा भाग हलक्या हाताने मसाज करा किंवा अॅलोवेरा जेलमध्ये बुडवून लावा; १५–२० मिनिटांनी धुवून टाका.
मुरुमांसाठी अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेली साल मुरुमांवर ५–१० मिनिटं चोळा आणि कोमट पाण्याने धुवा, ज्यामुळे पिंपल्स व सूज कमी होते.
कोरड्या आणि निस्तेज त्वचेसाठी केळीची साल आणि साखर मिसळून हलक्या हाताने स्क्रब करा, यामुळे डेड स्किन आणि ब्लॅकहेड्स दूर होतात आणि त्वचा मऊ, उजळ दिसते.
वाढत्या वयासोबत येणाऱ्या सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी सालीचा गुळगुळीत भाग चेहऱ्यावर चोळा, काही वेळाने धुवून टाका.