Badami Fort: कातळात कोरलेल्या अरुंद वाटा अन् ट्रेकिंगचा रोमांच, लाल पाषाणाच्या काळजात दडला चालुक्यांचा 1450 वर्षांचा इतिहास; 'दुर्गराज बदामी'

Manish Jadhav

बदामी किल्ला

चालुक्य साम्राज्याची राजधानी बदामी, ज्याला प्राचीन काळी 'वातापी' म्हटले जायचे, हे 6व्या ते 8व्या शतकादरम्यान बलाढ्य चालुक्य राजवंशाची राजधानी होती. हा किल्ला राजा पुलकेशी प्रथम याने इसवी सन 543 मध्ये बांधला.

Badami Fort | Dainik Gomantak

नैसर्गिक तटबंदी

हा किल्ला दोन उंच डोंगरांवर वसलेला असून तो संपूर्णपणे लाल वालुकाश्माच्या (Sandstone) खडकात कोरलेला आहे. येथील नैसर्गिक डोंगरकडेच किल्ल्याला अजेय सुरक्षा पुरवतात.

Badami Fort | Dainik Gomantak

'शिवालय'

किल्ल्याच्या माथ्यावर चालुक्यकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली 'वरचे शिवालय' आणि 'खालचे शिवालय' ही दोन प्रसिद्ध मंदिरे आहेत, जी भगवान शिवाला समर्पित आहेत.

Badami Fort | Dainik Gomantak

टिपू सुलतानची डागडुजी

मूळ किल्ला चालुक्यांनी बांधला असला तरी, 18व्या शतकात टिपू सुलतानने या किल्ल्याची डागडुजी केली. त्याने येथे मजबूत तटबंदी, तोफा आणि नवीन वास्तूंचे बांधकाम केले.

Badami Fort | Dainik Gomantak

धान्य कोठारे आणि प्राचीन तोफा

किल्ल्यावर आजही सुस्थितीत असलेली मोठी धान्य कोठारे, पाण्याचे हौद आणि टिपू सुलतानच्या काळातील जुन्या तोफा पाहायला मिळतात, ज्या इतिहासाची साक्ष देतात.

Badami Fort | Dainik Gomantak

अगस्त्य तलावाचे विहंगम दृश्य

किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरुन खाली असलेल्या विस्तीर्ण 'अगस्त्य तलावाचे' आणि संपूर्ण बदामी शहराचे विहंगम दृश्य दिसते. हे दृश्य फोटोग्राफीसाठी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

Badami Fort | Dainik Gomantak

ट्रेकिंग आणि साहसी अनुभव

किल्ल्यावर जाण्यासाठी खडकातून कोरलेल्या अरुंद पायऱ्या आहेत. हा ट्रेक काहीसा आव्हानात्मक असला तरी, माथ्यावर पोहोचल्यावर मिळणारा आनंद आणि निसर्ग सौंदर्य अतुलनीय आहे.

Badami Fort | Dainik Gomantak