Shreya Dewalkar
पणजी शहरात दरदिवशी हजारो नागरिक बसने प्रवास करत असतात,
परंतु पणजी बसस्थानक अनेक समस्यांच्या गर्तेत अडकले असून बसस्थानकावर अनेक समस्या आहेत.
पणजी बसस्थानकावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. प्रवेश मार्गावरच मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.
पणजी बसस्थाकावर गटारांची योग्य प्रकारे डागडुजी न केल्याने तसेच गटारावरील सिमेंटच्या लाद्या फुटल्याने बसचा टायर या गटारांमध्ये जाऊ शकतो.
तसेच बसस्थानकावर जेथे म्हापसा बस थांबते त्या ठिकाणी लोखंडी जाळी गटारावर आहे ती देखील सुटल्याने तेथेही बसचा टायर आत जाऊ शकतो.
म्हापसा बस जेथे लागते तेथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असल्याने ते प्रवाशांसाठीही धोक्याचे ठरत आहे.
कदंब बसस्थानकावर स्वच्छतेचा तसेच प्रवाशांसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
मागील तीन वर्षांपासून बस स्थानकांचे उडालेले पत्रे घातल्याने नागरिकांना आता या शेडमध्ये बससाठी थांबता येते अन्यथा नागरिकांना बससाठी थांबणे कठीण होत होते.
नाल्यामुळे दुर्गंधी
बसस्थानकाशेजारी एक नाला आहे त्या नाल्यात गलिच्छ पाणी साचलेले आहे,
तसेच अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहेत. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरलेली आहे.
पावसाळ्यात या नाल्यातील गलिच्छ पाणी स्थानकात येते.
नाल्यात पाणी तुंबत असल्याने आरोग्यासंबंधी विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.