Kavya Powar
गोड बेबी कॉर्न खायलाच चांगले नसते तर ते अनेक आजारांशी लढण्यास मदत करते.
बेबी कॉर्नमध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात.
बेबी कॉर्न आपली प्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि कर्करोग, हृदयरोग, मधुमेह यांसारख्या आजारांना प्रतिबंध करतात.
बेबी कॉर्नमध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि बीटा कॅरोटीन यांसारखे अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात.
याच्या नियमित सेवनाने स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, यकृताचा कर्करोग आणि इतर प्रकारचे कर्करोग टाळण्यास मदत करू शकते.
बेबी कॉर्नच्या सेवनाने ॲनिमियाचा त्रास असलेल्या लोकांना फायदा होतो.
बेबी कॉर्नमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील उपयुक्त आहे.