Akshata Chhatre
केस तुटणे, गळणे, कोंडा आणि कोरडेपणा अशा अनेक समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल.
अनेकदा आपण हेअर केअर प्रोडक्ट्स बदलतो, पण समस्या तशीच राहते, कारण समस्या बाहेरून नाही, तर शरीरातील कमतरतांमधून निर्माण होते.
केसांच्या प्रभावी दुरुस्तीसाठी बाह्य उपचारांसोबतच आहार आणि जीवनशैलीत सुधारणा करणे आवश्यक आहे.
म्हणूनच, केसांच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एका प्रभावी मॉर्निंग ड्रिंकबद्दल सांगत आहोत.
हे ड्रिंक बनवण्यासाठी फ्रिजमध्ये असलेले आवळ आणि आले लागतील.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि आलेमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना मजबूत बनवतात.
या ज्युसचे क्यूब्स गरम पाण्यात मिसळून रोज सकाळी प्यायल्यास केसांची वाढ जलद होते आणि अनेक समस्यांपासून आराम मिळतो.