Kavya Powar
सध्या इंटरनेटवर शोध घेतल्या जाणाऱ्या जागेत अयोध्येने गोव्यालाही मागे टाकले आहे.
बहुप्रतिक्षित राम मंदिराचे उदघाटन झाल्यानंतर अयोध्येला भेट देण्यासाठी ॲप वापरकर्ते आणि पर्यटकांनी लक्षणीयरित्या बुकिंग केल्यामुळे अयोध्या हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक बनण्यासाठी सज्ज झाले आहे.
यामुळे गोवा सरकारनेही आता आध्यात्मिक पर्यटनावर भर देण्याचे ठरवले आहे.
समाज माध्यमांवर दिलेल्या माहितीनुसार, सध्या अयोध्येतील खोलीचे रात्रीचे आरक्षण देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी सुमारे 10 टक्के आहे.
अयोध्येमुळे पर्यटन क्षेत्रात झालेल्या बदलाला प्रत्युत्तर म्हणून राज्य सरकार समुद्र-किनारा-केंद्रित पर्यटन प्रारूपामधून अधिक सर्वसमावेशक आणि लोककेंद्रित दृष्टिकोनाकडे वळत आहे.
गोव्यात येणारा सरासरी देशी पर्यटक चार रात्री आणि एक आंतरराष्ट्रीय पर्यटक नऊ रात्री राहतो. त्यांना आकर्षित करण्यासाठी वारसा पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे.
‘ओयो’चे रितेश अग्रवाल म्हणाले, अयोध्येत ओयो ॲप वापरकर्त्यांमध्ये ७० टक्के वाढ झाली आहे. गोव्यात हे प्रमाण ५० टक्के, तर त्याखालोखाल नैनिताल ६० टक्के इतके प्रमाण आहे.