गोमन्तक डिजिटल टीम
गर्भधारणा हा महिलांसाठी एक खास काळ असतो, या काळात काही पदार्थ टाळावेत. गरोदरपणात या पदार्थांचे सेवन टाळणे आरोग्यासाठी चांगले असते.
कच्च्या पपईचे सेवन गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरू शकते. गरोदरपणात कच्च्या पपईचे सेवन केल्यास गर्भपात होण्याची शक्यता वाढते.
महिलांनी गरोदरपणात महिलांनी कॅफीनचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे.
जर तुम्हाला निरोगी आणि सुरक्षित गर्भधारणा करायची असेल तर कच्चे मांस खाणे टाळा. गरोदरपणात कच्चे मांस खाल्ल्याने बाळाच्या आणि आईच्या आरोग्याला हानी पोहोचते.
गरोदरपणात महिलांनी धुम्रपान आणि मद्यपान करू नये. ही नशा आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
गरोदरपणात शरीर निरोगी ठेवण्यासाठी गरम मसाल्यांचे जास्त सेवन करू नका. दालचिनी, काळी मिरी, आले आणि हिंग यांसारखे जास्त मसाले खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो.
गरोदरपणात कच्च्या अंकुरलेल्या कडधान्यांचे सेवन केल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते.