Akshata Chhatre
दही हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त, थंडावा देणारं आणि पचायला हलकं मानलं जातं. अनेक घरांमध्ये रोजच्या जेवणात दह्याचा समावेश केला जातो.
विशेषत: उन्हाळ्यात, कारण ते शरीराला थंड ठेवतं आणि पचनक्रियेलाही मदत करतं. पण बऱ्याचदा लोक दही खाण्यात एक मोठी चूक करतात
ती म्हणजे दह्यासोबत काही अन्नपदार्थ एकत्र खाणं, जे शरीरासाठी ‘विषासारखं’ ठरू शकतं.
आयुर्वेदानुसार, काही विशिष्ट पदार्थ दह्याबरोबर खाल्ल्यास पचनावर ताण येतो, शरीरात विषारी घटक तयार होतात आणि त्यामुळे त्वचा विकार, अपचन, सर्दी-खोकला, अॅसिडिटी यांसारख्या समस्या निर्माण होतात.
दही आणि दूध हे दोन्ही जरी दुग्धजन्य असले तरी त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत दूध गरम तर दही थंड. दोन्ही एकत्र खाल्ल्यास वात आणि कफ वाढतो, ज्यामुळे पचन बिघडतं
मासे आणि दही एकत्र खाल्ल्यास शरीरात विषासारखी प्रतिक्रिया होऊ शकते, ज्यामुळे अॅलर्जी आणि पचनाच्या तक्रारी वाढतात.