Pranali Kodre
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍरॉन फिंचने 7 फेब्रुवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
फिंच वनडे आणि टी२० मधील एक उत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो
त्याने वनडेत 146 सामने खेळताना 5406 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 17 शतकांचा आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 103 सामने खेळताना 3120 धावा केल्या. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे.
फिंच 2015 सालच्या वनडे वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा भागही होता.
महत्त्वाचे म्हणजे फिंचच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विक्रमही आहे.
त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 3 जुलै 2018 रोजी झालेल्या टी20 सामन्यात 76 चेंडूत सर्वोच्च 172 धावांची खेळी केली होती.
तसेच त्याने इंग्लंडविरुद्ध 29 ऑगस्ट 2013 रोजी झालेल्या टी20 सामन्यात 156 धावांची खेळी केली होती.
त्यामुळे फिंच आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये दोन वेळा दीडशे पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा एकमेव खेळाडू आहे.
इतकेच नाही, तर फिंच ऑस्ट्रेलियाचा टी20 वर्ल्डकप जिंकणारा पहिला कर्णधार आहे.
फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2021 साली युएईमध्ये झालेला टी20 वर्ल्डकप जिंकला होता.
फिंचची वनडे आणि टी20 कारकिर्द जशी बहरली, तशी कसोटी कारकिर्द मात्र बहरू शकली नाही.
फिंचने कसोटीत केवळ 5 सामने खेळले, ज्यात त्याने 2 अर्धशतकांसह 278 धावा केल्या.