भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया सज्ज

Pranali Kodre

वनडे मालिका

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 22 सप्टेंबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे.

Steve Smith | Dainik Gomantak

वर्ल्डकपपूर्वी मालिका

ही मालिका वनडे वर्ल्डकपच्या तोंडावर होत असल्याने त्यादृष्टीनेही या मालिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

India vs Australia | Twitter

सराव

या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात आला असून सराव करत आहे.

Steve Smith | Dainik Gomantak

दिग्गजांचे पुनरागमन

ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीने या मालिकेसाठी उतरणार आहे, कारण ऑस्ट्रेलिया संघातून कर्णधार पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल असे खेळाडू दुखापतीनंतर पुनरागमन करताना दिसणार आहेत.

Pat Cummins | Dainik Gomantak

फोटो व्हायरल

त्यासाठी ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी मोहालीत नेट्समध्ये घाम गाळला आहे. त्यांचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

Steve Smith | Dainik Gomantak

ठिकाण

या मालिकेतील तिन्ही वनडे सामने 22, 24 आणि 27 सप्टेंबर रोजी खेळवले जाणार असून अनुक्रमे मोहाली, इंदूर आणि राजकोट येथे होणार आहे.

Australia | Twitter

वेळ

हे तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहेत.

Australia | Twitter

ख्रिस गेल: क्रिकेटमधील 'युनिवर्स बॉस'

Chris Gayle | Twitter
आणखी बघण्यासाठी