टीम इंडियाविरुद्ध 7 विकेट्स घेत चमकला ऑस्ट्रेलियन Todd Murphy

Pranali Kodre

भारताविरुद्ध नागपूरला झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा टॉड मर्फी चमकला.

Todd Murphy | Dainik Gomantak

मर्फीने या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात 47 षटके गोलंदाजी करताना 124 धावा देताना 7 विकेट्स घेतल्या.

Todd Murphy | Dainik Gomantak

विशेष म्हणजे मर्फीने या सामन्यातून ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणही केले आहे, त्यामुळे हा त्याचा पहिलाच कसोटी सामना होता.

Todd Murphy | Dainik Gomantak

त्यामुळे तो कसोटी पदार्पणातच ऑस्ट्रेलियाकडून एका डावात 7 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज आहे.

Todd Murphy | Dainik Gomantak

त्याच्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून अल्बर्ट ट्रॉट (8/43), बॉब मासी (8/53, 8/84), जेसन क्रेझा (8/215), आणि थॉमस केंडल (7/55) यांनी अशी कामगिरी केली आहे.

Todd Murphy | Dainik Gomantak

22 वर्षीय मर्फीसाठी भारताचा केएल राहुल कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट ठरला.

Todd Murphy | Dainik Gomantak

मर्फीने भारताच्या केएल राहुल व्यतिरिक्त, आर अश्विन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रविंद्र जडेजा, श्रीकर भारत आणि मोहम्मद शमी यांना बाद केले.

Todd Murphy | Dainik Gomantak

मर्फीने यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.

Todd Murphy | Dainik Gomantak
Rohit Sharma | Dainik Gomantak