Pranali Kodre
भारतात 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळली जाणार आहे.
वनडे वर्ल्डकपसाठी आता सहभागी संघांची तयारी सुरू झाली आहे. यातच ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेसाठी त्यांची नवी जर्सी लाँच केली आहे.
ऑस्ट्रेलियाची ही जर्सी नेहमीप्रमाणे पिवळ्या रंगात असून त्यात गडद हिरव्या रंगांची छटा आहे.
कॉलर आणि हाताच्या बॉर्डरला व शर्टच्या दोन्ही बाजूंना गडद हिरवा रंगाची छटा असून जर्सीवर मोठ्या अक्षरात ऑस्ट्रेलिया देशाचे नाव लिहिले आहे.
याशिवाय शर्टच्या दोन्ही बाजूना हिरव्या रंगाच्या खाली अँटी फिओना क्लार्क यांनी केलेले फर्स्ट नेशन आर्टवर्क आहे.
ऑस्ट्रेलियाच्या नव्या जर्सीवर उजव्या खांद्याच्या खाली वर्ल्डकपचा लोगो आणि भारताचे नाव दिसत आहे. तसेच डाव्या खांद्याच्या खाली ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा लोगो आहे.
भारत वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा मुख्य आयोजक आहे. त्याचमुळे भारताचे नाव हा वर्ल्डकप खेळणाऱ्या प्रत्येक संघाच्या जर्सीवर असणार आहे.
वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना भारताविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये होणार आहे.