Pranali Kodre
कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले.
कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हल मैदानावर पार पडला.
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला 209 धावांनी पराभूत केले.
त्यामुळे या विजयासह ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमधीलही विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले आहे.
ऑस्ट्रेलियासाठी हे विजेतेपद ऐतिहासिक ठरले आहे. त्यांनी या विजेतपदासह कोणालाही न जमलेला विक्रम नावावर केला आहे.
ऑस्ट्रेलिया पहिला पुरुष संघ ठरला आहे, ज्यांनी वनडे वर्ल्डकप, टी20 वर्ल्डकप, कसोटी चॅम्पिनयशीप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा चारही स्पर्धांचे विजेतेपद जिंकले आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया पुरुष संघाने तब्बल नवव्यांदा आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.
ऑस्ट्रेलिया पुरुष संघाने 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 पाचवेळा वनडे वर्ल्डकप, 2006 आणि 2009 साली चॅम्पियन्स ट्रॉफी, 2021 मध्ये टी20 वर्ल्डकप व आता कसोटी चॅम्पियनशीपचे विजेतेपद मिळवले आहे.