Manish Jadhav
लातूरपासून साधारण 20 किमी अंतरावर असलेला हा किल्ला 12व्या शतकात यादव काळात बांधला गेला आहे. हा किल्ला 'अंबरपूर' या नावानेही ओळखला जात असे.
डोंगर किंवा टेकडीवर नसून हा किल्ला सपाट जमिनीवर बांधलेला 'भुईकोट' प्रकारातील आहे. शत्रूला लांबून हा किल्ला चटकन लक्षात येत नाही, हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
किल्ल्याच्या संरक्षणासाठी येथे दुहेरी तटबंदी असून किल्ल्याच्या भोवती एक खोल खंदक आहे. पूर्वी या खंदकात पाणी आणि मगरी सोडून शत्रूला रोखले जात असे.
किल्ल्याची रचना अशा प्रकारे केली आहे की, तो सभोवतालच्या जमिनीच्या पातळीपेक्षा खाली आहे. यामुळे शत्रूच्या तोफांचे गोळे थेट तटबंदीवर न लागता किल्ल्यावरुन निघून जात असत.
या किल्ल्यावर आजही काही भव्य तोफा पाहायला मिळतात. त्यातील 'पर्जन्य तोफ' आणि 'बिजली तोफ' पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून या तोफांच्या लांबी आणि रचनेवरुन तत्कालीन युद्धकलेची प्रचिती येते.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आणि भिंतींवर काही पर्शियन शिलालेख आहेत. हे शिलालेख किल्ल्याचा इतिहास आणि तो कोणत्या काळात कोणाच्या ताब्यात होता, याची साक्ष देतात.
किल्ल्याच्या आत पाणी साठवण्यासाठी मोठे हौद आणि विहिरी आहेत. विशेष म्हणजे, येथे एक 'कटोरी हौद' नावाचे सुंदर बांधकाम पाहायला मिळते.
या किल्ल्यावर यादव, बहामनी, आदिलशाही, निजामशाही आणि नंतर मुघलांचे वर्चस्व होते. मराठ्यांच्या इतिहासातही या किल्ल्याला सामरिक महत्त्व होते.