Akshata Chhatre
लग्नानंतर काही काळ गेल्यावर काही व्यक्तींच्या मनात तिसऱ्या एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण किंवा मृदूभाव निर्माण होतो, आणि यामुळे मनात एक भावनिक गोंधळ निर्माण होतो.
स्वतःच्या जोडीदारावरील प्रेम कमी झाले आहे की काय, की फक्त नवीनतेमुळे दुसऱ्याविषयी वाटणारे आकर्षण हे क्षणिक आहे, हे समजणं कठीण होतं.
अशा भावना निर्माण होणं हे काही अपवादात्मक नाही हे मानवी स्वभावाचाच भाग आहे. मात्र, या भावनांकडे गांभीर्याने पाहणं आणि स्वतःलाच काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे.
तुमच्या सध्याच्या नात्यात काहीतरी कमी वाटतंय का? तुमचं भावनिक नातं कमकुवत झालं आहे का? आणि तुमचं दुसऱ्याविषयीचं आकर्षण केवळ भावनिक सुटका म्हणून आहे का?
कधीकधी या भावना फक्त आतल्या रिकामपणाची प्रतिक्रिया असू शकतात.
म्हणूनच, आपल्या सध्याच्या नात्यात संवाद वाढवणं, एकमेकांना वेळ देणं, भावना समजून घेणं आणि विश्वास निर्माण करणं हे फार महत्त्वाचं आहे.
कोणताही निर्णय घेण्याआधी स्वतःच्या भावना, गरजा आणि अपेक्षांचा खोल विचार करणं आवश्यक आहे, कारण नात्यांचं खूप काही आपल्या समजूतदारपणावर अवलंबून असतं.