Kavya Powar
थंडीच्या आगमनाने अनेक आजारांचा धोकाही वाढतो. यापैकी एक आजार म्हणजे दम्याची समस्या.
थंडीचे आगमन होताच दम्याच्या रुग्णांची संख्याही वाढू लागते.
दमा हा एक श्वसन रोग आहे ज्यामध्ये श्वसनमार्गामध्ये सूज आल्याने व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो.
दमा आणि सायनसचा त्रास असलेल्या रुग्णांना हिवाळ्याच्या काळात अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे.
दम्याचा अटॅक टाळण्यासाठी उबदार किंवा लोकरीचे कपडे घालावेत.
धुरामुळे हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांच्या समस्या वाढतात, त्यामुळे सायनस आणि अस्थमाच्या रुग्णांनी धुरापासून दूर राहावे.
अस्थमा आणि सायनसच्या रूग्णांसाठी दारू आणि धुम्रपान दोन्ही अतिशय धोकादायक आहेत. धुम्रपानामुळे फुफ्फुसे कमकुवत होतात, त्यामुळे दम्याच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात.