Kavya Powar
पूर्ण देशात मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे
देशात 2019 ते 2021 या तीन वर्षांत 13.13 लाख मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली
यातील सर्वाधिक मुली महिला मध्य प्रदेशातील आहेत.
आकडेवारीनुसार, 10 लाख 61 हजार 648 महिला अठरा वर्षांवरील असून दोन लाख 51 हजार 430 मुली या अठरा वर्षांखालील आहेत.
देशभरात महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारने अनेक पावले उचलल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली
यात लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी फौजदारी कायदा (सुधारणा) कायदा, २०१३ लागू करण्याचाही समावेश आहे.
12 वर्षांखालील मुलींवर बलात्काराबद्दल फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारा फौजदारी कायदा (सुधारित) 2018 लागू करण्यात आला.
या सर्व माहितीवरून अजूनही महिला आपल्याच देशात सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.