Pranali Kodre
आशिया चषक 2023 स्पर्धेचे विजेतेपद भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 17 सप्टेंबर रोजी जिंकले. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंका संघाला 10 विकेट्सने पराभूत केले.
या विजयासह भारताने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. यापूर्वी भारताने 1984, 1988, 1991, 1995, 2010, 2016 आणि 2018 साली आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले आहे.
भारताने एकूण 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली मिळून 8 आशिया चषक जिंकले आहेत.
भारताने मोहम्मद अझरुद्दीन, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी दोनदा आशिया चषक जिंकला आहे.
तसेच सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यांच्या नेतृत्वात प्रत्येकी एकदा आशिया चषक जिंकला आहे.
गावसकर यांच्या नेतृत्वाखी भारताने सर्वात पहिला आशिया चषक 1984 साली जिंकला.
1988 साली भारताने दिलीप वेंगसरकर यांच्या नेतृत्वात आशिया चषक जिंकला.
भारताने 1991 आणि 1997 साली मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली आशिया चषक जिंकला.
एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने 2010 आणि 2016 साली आशिया चषकावर नाव कोरले.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2023 पूर्वी 2018 साली आशिया चषकाकवर नाव कोरले.