Pranali Kodre
आशिया चषक स्पर्धेच्या साखळी फेरीतील बहुचर्चित भारत आणि पाकिस्तान सामना शनिवारी पहिल्या डावानंतर रद्द झाला.
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा केल्या. त्यानंतर पावसाचा जोर कायम राहिल्याने सामना रद्द करण्यात आला.
दरम्यान, या सामन्यात भारताने पहिल्या चार विकेट्स 15 षटकांच्या आतच 66 धावांत झटपट गमावल्या होत्या. यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या विकेट्सचाही समावेश होता.
विराट आणि रोहित या दोघांच्याही विकेट्स डावखुरा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने घेतल्या.
आफ्रिदीने 5 व्या षटकात 22 चेडूत 11 धावांवर खेळणाऱ्या रोहितला त्रिफळाचीत केले.
त्यानंतर आफ्रिदीने 7 व्या षटकात 7 चेंडूत 4 धावा करणाऱ्या विराटला त्रिफळाची केले.
त्यामुळे आफ्रिदी एकाच वनडे सामन्यात विराट आणि रोहित या दोघांनाही त्रिफळाचीत करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
आफ्रिदीने या सामन्यात 10 षटकात 4 विकेट्स घेतल्या. त्याने रोहित - विराट यांच्यानंतर हार्दिक पंड्याला 87 धावांवर आणि रविंद्र जडेजाला 14 धावांवर बाद केले.
दरम्यान आफ्रिदीने या 4 विकेट्सबरोबरच 250 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पाही पार केला.