Asia Cup: भारतीय संघ सुपर-4 साठी गाळतोय घाम

Pranali Kodre

आशिया चषक

आशिया चषक स्पर्धा 30 ऑगस्टपासून खेळली जात असून 6 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान सुपर फोरची फेरी खेळली जाणार आहे.

Hardik Pandya | Twitter

पहिला सुपर फोर सामना

भारताचा सुपर फोरचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.

India vs Pakistan | Twitter

जोरदार तयारी

या फेरीआधी भारतीय संघातील खेळाडूंनी नेट्समध्ये आणि जिममध्ये चांगलाच घाम गाळला आहे.

Virat Kohli at Gym | Twitter

फोटो

बीसीसीआयने भारतीय संघाच्या सराव सत्रातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shardul Thakur | Twitter

सराव

दरम्यन, सुपर फोरमधील सामने कोलंबोमध्ये होत आहेत, येथे सध्या पावसाचे वातावरण असल्याने भारताने अशावेळी इनडोअर सराव केला.

Team India | Twitter

केएल राहुलचे कमबॅक

सुपर फोरआधी भारतीय संघात केएल राहुलही जोडला गेला आहे. त्यामुळे तो दुखापतीतून सावरल्यानंतर पहिल्यांदाच खेळताना दिसू शकतो.

KL Rahul | Twitter

भारताचे सामने

भारतीय संघाला सुपर फोर फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा आहे, तर 15 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे.

Shubman Gill | Twitter

अंतिम सामना

सुपर फोर फेरीत अव्वल दोन क्रमांक मिळवणारे संघ 17 सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळणार आहेत.

KL Rahul - Hardik Pandya | Twitter
Jos Buttler | Dainik Gomantak