Priyanka Deshmukh
भारतीय क्रिकेट संघ आज आशिया कप 2022 साठी खेळणार आहे.
टीम इंडियाला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध दुबईत खेळायचा आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा मोठा सामना असेल.
आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे.
कोहलीच्या कारकिर्दीतील हा 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आहे.
100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कोहली भारताचा दुसरा खेळाडू ठरणार आहे.
भारतीय कर्णधार रोहित हा जगातील सर्वाधिक 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू आहे.
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100-100 सामने खेळणारा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा क्रिकेटपटू बनेल.
कोहलीने 262 एकदिवसीय आणि 102 कसोटी सामन्यांशिवाय आतापर्यंत 99 टी-20 सामने खेळले आहेत.
41 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोहली थेट पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार आ
कोहलीला गेल्या पाच महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय अर्धशतक आणि अडीच वर्षांपासून एकही शतक झळकावता आलेले नाही.