स्टीव्ह स्मिथची कसोटी सामन्यांची 'सेंच्यूरी'

Pranali Kodre

लीड्स कसोटी

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा सामना 6 जुलैपासून हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जात आहे.

Steve Smith | Twitter

100 वी कसोटी

हा सामना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथचा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे.

Steve Smith | Twitter

15 वा ऑस्ट्रेलियन

स्मिथ ऑस्ट्रेलियाकडून 100 कसोटी सामने खेळणारा 15 वा खेळाडू आहे.

Steve Smith | Dainik Gomantak

पदार्पण

स्मिथने 13 ते 16 जुलै 2010 दरम्यान लॉर्ड्सवर पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या गेलेल्या कसोटी सामन्यातून ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले होते.

Steve Smith | Twitter

सुरुवात

स्मिथने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात लेग स्पिनर म्हणून केली होती. तो सुरुवातीला खालच्या फळीत फलंदाजी करायला.

Steve Smith | Twitter

फलंदाजीतील प्रतिभा

मात्र, नंतर स्मिथने फलंदाज म्हणून आपली प्रतिभा दाखवण्यास सुरुवात केली.

Steve Smith | Twitter

दिग्गज

आजच्या घडीला स्मिथ सर्वोत्तम कसोटी फलंदाजांमध्ये गणला जातो.

Steve Smith | Dainik Gomantak

कारकिर्द

स्टीव्ह स्मिथने त्याच्या कसोटी कारकिर्दीत जवळपास 60 च्या सरासरीने 9000 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. यात त्याच्या 32 शतकांचा आणि 37 अर्धशतकांचा (आकडेवारी 6 जुलै 2023 पर्यंत) समावेश आहे.

Steve Smith | Twitter
Virat Kohli Sir Garfield Sobers | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी