कसोटीत 'या' कर्णधारांच्या नेतृत्त्वात संघांनी चेस केलं 250 धावांचं टार्गेट

Pranali Kodre

इंग्लंडचा विजय

बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंड क्रिकेट संघाने ऍशेस 2023 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.

Ben Stokes | Twitter

251 धावांचा पाठलाग

लीड्सला झालेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाने दिलेले 251 धावांचे आव्हान 50 षटकात 7 विकेट्स गमावत पूर्ण केले.

Ben Stokes | Twitter

कर्णधार बेन स्टोक्स

बेन स्टोक्सच्या नेतृत्त्वात 250 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वी पूर्ण करण्याची इंग्लंडची ही पाचवी वेळ होती.

Ben Stokes | Twitter

बेन स्टोक्सचा विक्रम

त्यामुळे स्टोक्स असा कर्णधार ठरला आहे ज्याच्या नेतृत्वात त्याच्या संघाने सर्वाधिकवेळा कसोटीत 250 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वी पूर्ण केले आहे.

Ben Stokes | Twitter

एमएस धोनी

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी असून त्याच्या नेतृत्वात भारताने 4 वेळा कसोटीत 250 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वी पूर्ण केले आहे.

MS Dhoni | Twitter

तिसरा क्रमांक

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ब्रायन लारा आणि रिकी पाँटिंग संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Ricky Ponting | Twitter

ब्रायन लारा

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या नेतृत्वात त्याच्या संघाने 3 वेळा कसोटीत 250 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वी पूर्ण केले आहे.

Brian Lara | Twitter

रिकी पाँटिंग

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नेतृत्वातही ऑस्ट्रेलियाने 3 वेळा कसोटीत 250 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वी पूर्ण केले आहे.

Ricky Ponting | Twitter
Sunil Gavaskar | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी