Ashes 2023: आंदोलनकर्ते मैदानात घुसताच बेअरस्टो बनला 'सिंघम'

Pranali Kodre

ऍशेस 2023

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस 2023 मालिकेतील दुसरा कसोटी सामना 28 जूनपासून लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरू झाला आहे.

Ashes Lords Test 2023 | Twitter

अडथळा

हा सामना सुरु झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या षटकापूर्वी दोन आंदोलनकर्त्या व्यक्तींमुळे अडथळा आला होता.

Ashes Lords Test 2023 | Twitter

आंदोलन

सध्या इंग्लंडमध्ये जस्ट स्टॉप ऑईलकडून आंदोलने केली जात आहेत. ब्रिटीश सरकारने नवीन तेल, वायू आणि कोळसा प्रकल्पांसाठी सर्व परवाने रद्द करावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Ashes Lords Test 2023 | Twitter

आंदोलनकर्त्यांचा मैदानात प्रवेश

याच आंदोलनातील दोन व्यक्तींनी दुसरा कसोटी सामना सुरु झाल्यानंतर दुसऱ्या षटकापूर्वी मैदानात प्रवेश केला होता. त्यांनी त्यांच्याबरोबर केशरी रंगाची पेंट पावडरही आणली होती.

Ashes Lords Test 2023 | Twitter

खेळाडूंनी रोखलं

दरम्यान, मैदानातील खेळाडू आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना खेळपट्टी खराब करण्यापासून रोखले.

Ashes Lords Test 2023 | Twitter

बेअरस्टो बनला सिंघम

हे दोन आंदोलनकर्ते जेव्हा मैदानात आले, तेव्हा त्यातील एकाला इंग्लंडचा यष्टीरक्षरक जॉनी बेअरस्टोने पकडले आणि त्याने त्याला मैदानाबाहेर नेले, त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले.

Ashes Lords Test 2023 | Twitter

स्टोक्स - वॉर्नरनंही अडवलं

तसेच दुसऱ्या आंदोलनकर्त्याला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने खेळपट्टीवर जाण्यापासून रोखले. त्यानंतर लगेचच सुरक्षारक्षकांनी येऊन त्याला पकडले.

Ashes Lords Test 2023 | Twitter

खेळ थांबला

या घटनेदरम्यान काही मिनिटांसाठी खेळ थांबला होता. तसेच बेअरस्टोलाही त्याची जर्सी बदलून नवीन जर्सी घालून यावी लागली. तसेच ग्राउंड्सस्टाफने पेंट पावडरही मैदानातील काढून टाकली. त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला.

Ashes Lords Test 2023 | Twitter
World Cup 2023 | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी