Rahul sadolikar
आशा भोसले 8 सप्टेंबर रोजी 90 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
आशा भोसले आणि ओपी नय्यर यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चा होत्या, परंतु 1970 च्या दशकात ते वेगळे झाले यानंतर आर डी बर्मन आशाजींच्या आयुष्याचा एक भाग बनले होते.
20 हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमधील विविध चित्रपटांमध्ये तिची कारकीर्द सहा दशकांहून अधिक काळ आशाजींनी संगीतसृष्टीवर अधिराज्य गाजवलं
इंडस्ट्रीत या गोष्टीची खूप चर्चा झाली की आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्यात टोकाची स्पर्धा होती.
झुमका गिरा रे, मेरा कुछ सामान, मुझे रंग दे यांसारख्या गाण्यातून आशाजींनी रसिकांना वेड लावलं.
“ले के पहला पहला प्यार” (“CID”; 1956), आशाने मुख्य गायक मोहम्मद रफी आणि शमशाद बेगम यांच्यासोबत गायन केलं होतं,
बीआर चोप्राचा “नया दौर” (1957), साठी आशाजींना पहिल्यांदा ब्रेक मिळाला.