Pranali Kodre
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी केवळ भारतातच नाही, तर जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.
त्यामुळे त्याच्याबद्दल सातत्याने चर्चा होत असतात. मात्र, सध्या तो नाही, तर त्याची सासू शीला सिंग या चर्चेचे कारण ठरल्या आहेत.
धोनीच्या सासू शीला सिंग त्याच्या कंपनीच्या सीईओही आहेत अशी चर्चा आहे.
धोनीने त्याचे धोनी एंटरटेन्मेन्ट लिमिटेड ही प्रोडक्शन कंपनी सुरू केली आहे.
याच प्रोडक्शन कंपीनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (ceo) म्हणून शीला सिंग काम पाहात असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे.Sa
या कंपनीच शीला यांच्याबरोबरच धोनीची पत्नी म्हणजेच शीला यांची मुलगी साक्षी सिंग देखील सीईओ आहे.
रिपोर्ट्समध्ये असाही दावा आहे की धोनी एंटरटेन्मेन्ट लिमिटेडची संपत्ती ८०० कोटींपेक्षाही जास्त आहे.