Kavya Powar
डिसेंबर महिन्यात गोव्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते
यावेळी बीचवर जोरदार नाईट पार्टी सुरू असतात
राज्यातील पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर राज्याच्या किनारी भागात सर्वत्र संगीत रजनी, पार्ट्यांना ऊत आला आहे.
विशेष म्हणजे बंदी असूनही रात्री उशिरापर्यंत कळंगुटपासून बागा, हणजूण, वागातोरपर्यंत त्या खुलेआम सुरूच असतात.
त्यामुळे परिसरात हवा प्रदूषित तर होतेच, शिवाय ध्वनिप्रदूषणही वाढले आहे.
हॉटेल्स, रिसॉर्टवाल्यांना ना कायद्याची भीती, ना सरकारची. पोलिस यंत्रणेला विचारतो कोण? अशी सध्याची परिस्थिती बनली आहे
रात्रभर सुरू असलेल्या या पार्ट्यांमुळे स्थानिक हैराण झाले आहेत