Rahul sadolikar
अरमान कोहली सध्या ग्लॅमरपासुन लांब असला तरी त्याची सोशल मिडीयावर आजही चर्चा सुरू आहे.
अरमान कोहली सुरूवातीला ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे चर्चेत राहिला. त्यानंतर आता गर्लफ्रेंडला केलेल्या मारहाणीमुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
एक्स गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने अरमान कोहलीला दोन पर्याय दिले आहेत.
न्यायालयाने अरमान कोहलीला स्पष्टपणे सांगितले की, एकतर एक्स गर्लफ्रेंडला पैसे द्या नाहीतर तुरुंगात जा
हे प्रकरण 2018 सालचे आहे जेव्हा अरमान कोहलीची एक्स गर्लफ्रेंड नीरू रंधावाने त्याच्यावर केस दाखल केली होती.
अरमानने एक्स गर्लफ्रेंडला ५० लाख रुपये देऊन तोडगा काढावा अन्यथा तुरुंगात शिक्षा भोगण्यास तयार राहावे.
सध्या या प्रकरणी अरमानची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, कोर्टाने त्याच्या वकिलाला त्याचा पर्याय निवडण्यासाठी १८ जुलैपर्यंत वेळ दिला आहे.