एकाच षटकात 31 धावा देणाऱ्या Arjun Tendulkar चा नकोसा विक्रम

Pranali Kodre

आयपीएल 2022 स्पर्धेत 22 एप्रिलला पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात वानखेडे स्टेडियमवर सामना झाला.

MI vs PBKS | Dainik Gomantak

या सामन्यात पंजाब किंग्स फलंदाजी करत असताना 16 व्या षटकात अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजी करताना तब्बल 31 धावा खर्च केल्या.

Arjun Tendulkar | Dainik Gomantak

त्याने या सामन्यात हे षटक टाकण्यापूर्वी सुरुवातीला 2 षटके गोलंदाजी करताना एका विकेटसह 17 धावा दिल्या होत्या.

Arjun Tendulkar | Dainik Gomantak

पण त्याने टाकलेले 16 वे षटक 31 धावांमुळे चांगलेच महागात पडले. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने गोलंदाजी केलेले हे दुसऱ्या क्रमांकाच सर्वात महागडे षटक ठरले.

Arjun Tendulkar | Dainik Gomantak

मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करताना एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम डॅनिएल सॅम्सच्या नावावर असून त्याने 2022 मध्ये पुण्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गोलंदाजी करताना एका षटकात 35 धावा दिल्या होत्या.

Daniel Sams | Dainik Gomantak

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अर्जुन असून तिसऱ्या क्रमांकावर पवन सुयाल आहे. त्याने 2014 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध एका षटकात 28 धावा दिलेल्या.

Pawan Suyal | Dainik Gomantak

तसेच अल्झारी जोसेफ यानेही 2019 आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध एका षटकात 28 धावा दिल्या होत्या.

Alzarri Joseph | Dainik Gomantak

मिचेल मॅक्लेघननेही पंजाब किंग्सविरुद्धच 2017 आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करताना एका षटकात 28 धावा खर्च केल्या होत्या.

Mitchell McClenaghan | Dainik Gomantak
Virat Kohli | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी