Pramod Yadav
सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन तेंडुलकर रणजी ट्रॅफीसाठी गोव्याकडून खेळत आहे.
राजस्थानसोबत सुरू असलेल्या सामन्यात अर्जुनने शतकी खेळी केली आहे.
गोव्याकडून अर्जून तेंडुलकर आणि सुयश प्रभूदेसाईने शानदार कामगिरी केली आहे. दोघांनीही शतकं झळकावली आहेत.
या शतकासह अर्जूनने त्याचे वडील आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या एका विक्रमाशी बरोबरीही केली आहे.
अर्जूनने याच सामन्यातून गोव्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही पदार्पण केले आहे.
पहिल्याच प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यामध्ये शतक करण्याच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 178 चेंडूत शतक झळकावताना 12 चौकार आणि 2 षटकार मारले.