Rahul sadolikar
'केसरिया', 'चन्ना मेरेया', 'ए दिल है मुश्किल' आणि 'तुम ही हो' अशी अनेक गाणी देऊन वेड लावणाऱ्या अरिजित सिंगला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
'अरिजीत सिंह'ला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 'पद्मावत'मधील 'बिंते दिल' या गाण्यासाठी अरिजितने हा पुरस्कार जिंकला आहे.
रिअॅलिटी शोमधल्या रिजेक्टपासुन ते गाण्यांच्या कॅनिंगपर्यंत, अरिजितची नशिबाने अनेकवेळा परीक्षा घेतली आहे.
अरिजित सिंग यांचा जन्म 25 एप्रिल 1987 रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झाला. त्यांचे वडील कक्कर सिंग शीख होते, तर आई अदिती बंगाली होती.
टिप्सचे मालक रमेश तुराणी यांनीही अरिजितला एक अल्बम ऑफर केला, जो रेकॉर्डही केला होता, परंतु तो कधीही रिलीज झाला नाही
अरिजीतने 2010 मध्ये 'गोलमाल 3', 'क्रुक' आणि 'अॅक्शन रिप्ले' या तीन चित्रपटांसाठी संगीतकार प्रीतमसोबत काम केले.
अरिजित सिंगने 2011 मध्ये आलेल्या 'मर्डर 2' या चित्रपटातून गायक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटातील 'फिर मोहब्बत' या गाण्याला त्यांनी आवाज दिला. पण त्याला खरी ओळख मिळाली ती आशिकी 2 मधुन.