Akshata Chhatre
पूर्वी तीन-चार मुलं असलेली कुटुंबं सामान्य मानली जात असतानाच, आजच्या काळात महागडं शिक्षण, नोकरी करणाऱ्या माता, विभक्त कुटुंबसंस्था आणि उशिरा पालकत्व यामुळे एकुलतं एक मूल असणं वाढलं आहे.
अभ्यासानुसार एकुलत्या मुलांमध्ये सामाजिक कौशल्यांची कमतरता असू शकते, म्हणून अशा मुलांना लहानपणापासूनच समवयस्कांसोबत वेळ घालवण्याची संधी देणं गरजेचं ठरतं.
एकुलती मुलं गंभीर, तर्कसंगत आणि कमी विनोदी स्वभावाची असू शकतात, त्यामुळे पालकांनी त्यांच्यासोबत मोकळेपणाने संवाद साधून हास्याचं वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे.
मुलांवर संपूर्ण लक्ष असल्यानं ते परावलंबी आणि आळशी होऊ शकतात, म्हणूनच त्यांना लहानपणापासूनच स्वतःची कामं स्वतः करण्यास प्रवृत्त करावं.
पालकांनी मुलाला जबाबदाऱ्या देऊन त्यांना स्वतंत्र होण्यास मदत करावी.
मुलं कधी कधी लहान प्रौढांसारखी वागतात, त्यामुळे त्यांच्या समोर घरगुती वाद किंवा आर्थिक चर्चा टाळाव्यात आणि त्यांना त्यांच्या वयाशी सुसंगत विषयांवरच मत मांडण्याची सवय लावावी.
मुलाने स्वतःच्या सहवासाचा आनंद घेणं शिकणं, वाचन किंवा छंदांद्वारे स्वतःला व्यक्त करणं, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी उपयुक्त ठरू शकतं.