Akshata Chhatre
ऑफिस रोमान्स हा विषय जितका गोड आणि आकर्षक वाटतो, तितकाच तो गुंतागुंतीचाही असतो
रोजच्या कामात एकत्र वेळ घालवणे, प्रोजेक्टवर टीम म्हणून काम करणे, एकमेकांच्या गुणदोषांना जवळून ओळखणे या सगळ्यामुळे सहकाऱ्यांमध्ये जवळीक निर्माण होऊ शकते.
इतिहासातही अशा अनेक कथा आहेत जिथे मोठ्या कंपन्यांपासून छोट्या संस्थांपर्यंत सहकाऱ्यांमध्ये प्रेमसंबंध जुळले. पण अशा नात्यांचा शेवट नेहमी सुखदच होतो असे नाही
पदोन्नती, ऑफिस पॉलिटिक्स किंवा कंपनीच्या नियमांचे उल्लंघन यामुळे अशा नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.
ऑफिस रोमान्सचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याचा परिणाम फक्त दोन व्यक्तींवरच नाही, तर संपूर्ण टीमच्या वातावरणावर होतो.
त्यामुळेच अनेक कंपन्या अशा नातेसंबंधांवर कठोर नियम लागू करतात.
योग्य पद्धतीने सांभाळले, तर असे संबंध वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आनंद आणू शकतात; पण थोडीशी चूकही करिअर धोक्यात आणू शकते.