गोमन्तक डिजिटल टीम
आरोग्याच्या दृष्टीने आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते.
आपल्या सतत आजारी पडण्यामागे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असणे हे एक कारण असू शकते.
आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असते त्यामुळे शरीराच्या सगळ्याच क्रिया पूर्ण होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते
तुम्हाला पुरेशी झोप मिळते आहे का ? याचे निरीक्षण करा. कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर रोग, सूज, जखम ह्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काही प्रथिने सोडते.
आपले तोंड हा अनेक बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. अनेक वाईट बॅक्टेरिया आपल्या तोंडात वाढतात आणि नंतर आपल्याला ते आजारी पाडतात.
जर आपल्याला अतिरिक्त ताण असेल तर त्यामुळे आपल्या शरीराची खूप हानी होते आणि आपण आजारी पडतो.