Akshata Chhatre
अरब महिलांचे निखळ आणि नैसर्गिक सौंदर्य नेहमीच लोकांच्या आकर्षणाचा विषय असतो.
महागड्या सौंदर्यप्रसाधनांऐवजी त्यांच्या सौंदर्याचे गुपित काही सोप्या घरगुती पद्धतींमध्ये दडलेले आहे.
त्यांचे सौंदर्य हे ओट्स, तांदळाचे पीठ, तीळ आणि दही यांचा एकत्रित वापर करून बनवलेल्या स्क्रबवर अवलंबून असते.
ओट्स त्वचेला ओलावा देऊन मऊ करतात, तर तांदळाचे पीठ नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करते, ज्यामुळे त्वचेतील घाण आणि मृत पेशी निघून जातात.
तिळामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि फॅटी अॅसिड्स त्वचेला खोलवर पोषण देतात, ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.
दह्यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला सौम्यपणे एक्सफोलिएट करते आणि तिला चमकदार बनवते.
हे सर्व घटक एकत्र करून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला हलक्या हाताने घासल्यास अरब महिलांसारखी उजळ त्वचा मिळू शकते. हा उपाय बाजारातील रासायनिक उत्पादनांपेक्षा सुरक्षित, परवडणारा आणि दीर्घकाळ टिकणारा आहे.