Akshata Chhatre
पावसाळ्याचं आगमन होताच वातावरणात वाढलेला दमटपणा आणि सूक्ष्म जंतू त्वचेवर थेट परिणाम करतात मुरुम, खाज, पिग्मेंटेशन, पोत खराब होणं अशा समस्या चेहऱ्याचं तेज कमी करतात.
केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनं या दिवसांत त्वचेला हलकं करण्याऐवजी जड बनवतात; म्हणूनच घरच्या घरी आणि नैसर्गिक पद्धतीने केलेले उपाय जास्त प्रभावी ठरतात.
विशेषतः रात्री झोपण्याआधी केलेले हे पाच सोपे उपाय करून पाहा. यामुळे नक्कीच परिणाम दिसून येतील.
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेल्या कडुलिंबाच्या पानांचं पाणी उकळून थंड करून चेहरा धुणं, ज्यामुळे पुरळ, खाज आणि संसर्गजन्य समस्या कमी होतात.
चेहरा स्वच्छ करून त्यावर कोरफडीचा गर किंवा जेल लावणं, ज्यामुळे मुरुम कमी होतात, त्वचेला थंडावा मिळतो आणि नैसर्गिक चमक येते.
टोमॅटो रसात गुलाबजल आणि ग्लिसरीन मिसळून चेहऱ्यावर लावणं, ज्यामुळे अतिरिक्त तेल कमी होतं, त्वचा उजळते आणि टोन एकसंध होतो.
काकडी आणि कोरफडीचा रस एकत्र करून लावणं, जे त्वचेला थंडावा देतं आणि डार्कनेस किंवा पिग्मेंटेशन कमी करतं