Akshata Chhatre
वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.
मात्र, धूप न टाळणे, धूम्रपान, अपुरी झोप आणि असंतुलित आहार यांसारख्या वाईट सवयींमुळे ही चिन्हे कमी वयातच दिसू लागतात.
या समस्येवर मात करण्यासाठी रासायनिक क्रीम्सऐवजी तुम्ही घरात सहज उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून एक प्रभावी नैसर्गिक उपाय करू शकता.
या नुसख्यासाठी तुम्हाला फक्त ४ गोष्टी लागतील; कच्चे दूध - ४ चमचे, गुलाबाच्या पाकळ्या, कोरफड जेल, व्हिटॅमिन-ई कॅप्सूल. raw milk for face
गुलाबाच्या पाकळ्या हाताने चांगल्या प्रकारे कुस्करून घ्या. त्यामध्ये कच्चे दूध, कोरफड जेल आणि व्हिटॅमिन-ई कॅप्सूल मिसळा. हे मिश्रण एका स्वच्छ कपड्याने गाळून घ्या.
रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ चेहऱ्यावर या मिश्रणाने १०-१५ मिनिटे मसाज करा आणि रात्रभर तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुवा.
लॅक्टिक ॲसिडमुळे त्वचा मॉइश्चराइझ होते, टॅनिंग आणि पिगमेंटेशन कमी होते. अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सीमुळे त्वचा उजळते आणि नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. त्वचेला थंडावा, नमी आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मिळतात.