Akshata Chhatre
प्रत्येक व्यक्तीला आपली त्वचा नेहमीच तेजस्वी, मऊ आणि डागरहित दिसावी असे वाटते, पण वाढते प्रदूषण, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अस्वास्थ्यकारक जीवनशैलीमुळे त्वचेच्या समस्या वाढू लागतात.
मुरुम, ब्लॅकहेड्स, सुरकुत्या, पिगमेंटेशन अशा त्रासांपासून मुक्त होण्यासाठी अनेकजण बाजारातील महागडी स्किन केअर उत्पादने वापरतात, पण त्यामध्ये असलेले रसायन त्वचेस हानी पोहोचवतात.
अशा वेळी नैसर्गिक उपाय जास्त परिणामकारक ठरतात आणि त्यातील एक उत्तम पर्याय म्हणजे कच्चं दूध.
दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड, प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे त्वचेला पोषण देऊन ती उजळ, मुलायम आणि तरतरीत ठेवतात.
कच्चं दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा स्वच्छ होते, मृत पेशी दूर होतात आणि त्वचेचा टोन सुधारतो. दुधातील दाहनाशक गुणधर्म मुरुम, सनबर्न किंवा लालसरपणा कमी करण्यास मदत करतात.
अधिक चांगला परिणाम मिळवण्यासाठी दुधात मध, हळद किंवा कॉफी पावडर मिसळून मास्क बनवता येतो. दूध आणि मध एकत्र लावल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक चमक येते
दूध आणि कॉफी पावडरचा मास्क पिगमेंटेशन कमी करतो आणि त्वचेला गडद डागांपासून मुक्त करतो. दूध आणि हळद एकत्र लावल्याने मुरुम कमी होतात आणि त्वचा उजळते.